सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा समारोप; फुलवा, आय अॅग्री, अनृतबंध ठरल्या उत्कृष्ट एकांकिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:00 AM2019-02-05T11:00:13+5:302019-02-05T11:02:25+5:30
सोलापूर : सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रविवारी समारोप झाला़ या स्पर्धेत फुलवा या एकांकिकेने प्रथम तर आय अॅग्रीने ...
सोलापूर : सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रविवारी समारोप झाला़ या स्पर्धेत फुलवा या एकांकिकेने प्रथम तर आय अॅग्रीने द्वितीय क्रमांक पटकावला़ अनृतबंध या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला़ रविवारी रात्री उशीरा विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
हुतात्मा स्मृती मंदिरात पारितोषिक वितरण समारंभ झाला. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण कालेकर, अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, अशोक किल्लेदार, विजय साळुंखे, अशोक शेट्टी, शांता येळमकर, विठ्ठल बडगंची आणि परीक्षक नीता कुलकर्णी व क्षमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी परीक्षक क्षमा कुलकर्णी यांनी मनोगतातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून युवा पिढीने उत्कृष्ट एकांकिका सादर केल्याचे गौरवोद्गार काढले़ सर्व एकांकिका या अभ्यासपूर्णतेने सादर केल्याचे सांगितले़ सूत्रसंचालन प्रा़ ज्योतिबा काटे यांनी केले तर आभार विठ्ठल बडगंची यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल
- - उत्कृष्ट एकांकिका : प्रथम- फुलवा (भरतनाट्यम संशोधन मंदिर, पुणे), द्वितीय - आय अॅग्री (आमचे आम्ही, पुणे), तृतीय - अनृतबंध (रंगश्रद्धा प्रतिष्ठान)
- - उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम - शिवानंद चलवादी : अनृत बंध (रंगश्रद्धा प्रतिष्ठान), द्वितीय- विजयकुमार पोतदार : फुलवा (भरतनाट्यम संशोधन मंदिर), तृतीय - प्रमोद खांडेकर : रंगबावरी (अस्तित्व मेकर्स, सोलापूर)
- - उत्कृष्ट अभिनय : पुरुष प्रथम - आकाश बनसोडे : मसणातलं सोनं (मानवता प्रॉड़ बार्शी), द्वितीय - केदार देसाई : सरफिºया (जिराफ थिएटर,मुंबई), तृतीय - प्रणव जोशी : आय अॅग्री ( आम्ही आमचे, पुणे)
- - उत्कृष्ट अभिनय : स्त्री प्रथम - अपर्णा गव्हाणे : नोंदी आत्महत्येच्या (यंग चॅलेंजर्स, सोलापूर), द्वितीय - पल्लवी दशरथ : एव्हरी डे इज संडे (टीमवर्क, सोलापूर), तृतीय - सायली बांदकर : रेनबोवाला (गंधर्व कलाधारण मुंबई)
- - उत्कृष्ट नेपथ्य : प्रथम - शुभम मारडकर, प्रसन्न गायकवाड, अमन बागवान : एव्हरी डे इज संडे (टीमवर्क, सोलापूर), द्वितीय - राजेश जाधव : अनृतबंध (रंगश्रद्धा प्रतिष्ठान, सोलापूर), तृतीय - दिगदेव, रोहीत वायकर: रेनबोवाला(गंधर्व कलाधारण, मुंबई)
- - उत्कृष्ट प्रकाशयोजना : प्रथम - जयप्रकाश कुलकर्णी (अनृत बंध), द्वितीय - उमाकांत (एव्हरी डे इज संडे), तृतीय - आशिष भागवत (डेटींग विथ रेन)
- - उत्कृष्ट पार्श्वसंगीत :प्रथम - सागर दिंडे (एव्हरी डे इज संडे), द्वितीय - ऐश्वर्या बटवाल (सरफिºया), तृतीय - अद्वैत कुलकर्णी (अनृत बंध)
- - खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या एकांकिका : प्रथम - अनृत बंध (जयप्रकाश कु लकर्णी), द्वितीय - ट्रँगल (अभिजित केंगार), तृतीय - राजेंद्र काळभोर (सचिन)
- - उत्कृष्ट कलावंत : प्रथम - अवंती कुलकर्णी (नाव : आत्मभान, कोल्हापूर), द्वितीय - स्वानंदी भारताल