सुशीलकुमार शिंदे यांनीच सोलापूर लोकसभेची निवडणुक लढवावी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बरडे यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:07 PM2017-12-13T16:07:57+5:302017-12-13T16:09:56+5:30

‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. 

Sushilkumar Shinde should fight for Solapur Loksabha elections, Shivsena's district coordinator Varadhe | सुशीलकुमार शिंदे यांनीच सोलापूर लोकसभेची निवडणुक लढवावी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बरडे यांचे साकडे

सुशीलकुमार शिंदे यांनीच सोलापूर लोकसभेची निवडणुक लढवावी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बरडे यांचे साकडे

Next
ठळक मुद्देआपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच दिले होतेशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून बरडे नाराज सोलापुरातील राजकारणाची गणिते बदलण्याची चर्चा


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : ‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. 
आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच दिले होते. त्यानंतर विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी शिंदे हेच आपले प्रतिस्पर्धी असतील, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच बरडे यांनी मंगळवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माऊली पवार उपस्थित होते. 
यावेळी बरडे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, शिंदे हे काँग्रेसचे तर मी शिवसेनेचा आहे. आमच्या पक्षप्रमुखांशी त्यांच्या वेळोवेळी भेटी होत असतात. त्यांच्यात कौटुंबिक मैत्री आहे. मी देखील अधून-मधून शिंदे यांना सोलापुरात भेटत असतो. यात मला काहीच गैर वाटत नाही, असे स्पष्ट करुन त्यांनी शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.
--------------------
नाराजीमुळे बरडेंची भूमिका
- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून बरडे नाराज आहेत. त्यातच कोठे यांनी ऐनवेळी उमेदवारी कापल्याने महिला आघाडीच्या एक प्रमुखही नाराज आहेत. या दोन्ही नाराजांनी शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापुरातील राजकारणाची गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.
-------------------
शिंदे हे राजकारणातील भीष्म पितामह
सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या  राजकारणातील भीष्म पितामह आहेत. दीर्घ राजकीय  व प्रशासकीय अनुभवाचा हा नेता आहे. त्यांचे सर्वच पक्षात संबंध आहेत. सोलापूर मनपावर ३०० कोटींचे कर्ज आहे. त्यातून तेच मार्ग काढू शकतील.  हा विश्वास आहे. म्हणून चर्चा करण्यासाठी त्यांची भेट               घेतली.  माझा वैयक्तिक कसलाही स्वार्थ नाही. खासदार शरद  बनसोडे, सहकारमंत्री  सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार  देशमुख हे  वेळोवेळी  शिंदे यांना भेटतच असतात. मी भेटलो म्हणून काय बिघडले.?  माझ्या भेटीची कल्पना लगेच मातोश्रीवर दिली आहे. उद्धवसाहेबांवर  गरळ ओकणाºया नारायण राणे यांच्या व्यासपीठावर  सोलापुरातील शिवसेनेचा एक पदाधिकारी जातो याची आम्हाला लाज वाटते. 
- पुरुषोत्तम बरडे, 
जिल्हा समन्वयक शिवसेना

Web Title: Sushilkumar Shinde should fight for Solapur Loksabha elections, Shivsena's district coordinator Varadhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.