सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारण सोडून आध्यात्माकडे वळावे; नीलम गोºहे यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 06:26 PM2019-03-25T18:26:30+5:302019-03-25T18:31:07+5:30
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. त्यांनी आध्यात्माकडे वळावे, असा सल्ला शिवसेना नेत्या ...
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. त्यांनी आध्यात्माकडे वळावे, असा सल्ला शिवसेना नेत्या आमदार नीलम गोºहे यांनी सोमवारी सोलापुरात दिला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प मेळाव्यात त्या बोलत होत्या. गोºहे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे आता ज्येष्ठ नेते झाले आहेत. त्यांनी स्वत:हून राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी.
डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य अध्यात्मातून राजकारणात आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शिंदे यांनी अध्यात्माच्या मार्गाला लागावे. यावेळी शिंदे यांनी सुकन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. त्यांना मतदान तरी झाले असते, असा टोलाही गोºहे यांनी लगावला.