सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न चार वर्षात २१ लाखांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:01 AM2019-03-26T02:01:43+5:302019-03-26T02:02:04+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे.

Sushilkumar Shinde's income increased by 21 lakhs in four years | सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न चार वर्षात २१ लाखांनी वाढले

सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न चार वर्षात २१ लाखांनी वाढले

googlenewsNext

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे.
शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्मो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ (आज बाजारभाव किमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फॉर्म हाऊस व एरंडवडे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे.

९५५ ग्रॅमचे दागिने
शिंदे कुटुंबियांकडे ९५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.

शिवाचार्यांच्या नावे पावणे तीन लाखांची मालमत्ता
भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावे सहा लाख ४६ हजार ७९ रुपयांची जंगम तर दोन कोटी ७२ लाख २४ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

आंबेडकरांकडे वाहन नाही
बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ४१ लाख ८१ हजार १८९ रुपये, त्यांच्या पत्नी अंजली यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रुपये आणि मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा प्रलंबित नाही. त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Web Title: Sushilkumar Shinde's income increased by 21 lakhs in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.