coronavirus; रेल्वेत खोकणाऱ्या कोरोना संशयित कतार रिटर्न प्रवाशाला दौंडमध्येच रोखले
By appasaheb.patil | Published: March 21, 2020 06:33 PM2020-03-21T18:33:58+5:302020-03-21T19:47:19+5:30
उद्यान एक्सप्रेस; कोरोना संशयित रूग्णास पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले
सोलापूर : मुंबईहुन गुलबर्ग्याकडे निघालेल्या उद्यान एक्सप्रेसमधील कोरोना संशयित (क्वारंटाइन) रेल्वे प्रवाशाला दौंडमध्येच रोखण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले़ दरम्यान, खबरदारी म्हणून एस ५ या डब्यातील ५६ लोकांची तपासणी करून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडू नका अशी सक्त सुचना देऊन सोडण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुलबर्गा येथील एक तरूण कोरोना संशयित रूग्ण २० मार्च रोजी विमानाने कतार (आखाती देश) येथुन निघून २१ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता तो मुंबई विमानतळावर दाखल झाला होता़ त्यानंतर तो मुंबई विमानतळावरून अॅटो रिक्षाने अंधेरी रेल्वे स्टेशनवर गाठले होते.
दरम्यान, लोकल ट्रेनने प्रवास करून तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दाखल झाला़ तेथुन गाडी क्रमांक ११३०१ उद्यान एक्सप्रेस कोच नंबर एस ५ सीट नंबर ७१ वर बसला होता़ याचवेळी तिकीट तपासणी करण्यासाठी आलेल्या तिकीट निरीक्षक (टीसी)ला त्याच्या हातावरील विमानतळावर मारलेला शिक्का दिसून आला़ शिवाय सतत खोकत व शिंकत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर तात्काळ तिकीट तपासणी अधिकाºयाने दौंड रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथकाला पाचारण केले़ दौंड रेल्वे स्थानकावर गाडी थांबवून संबंधित रूग्णास वैद्यकीय पथकाच्या ताब्यात दिले़ त्यानंतर त्या डब्यात असलेल्या ५६ प्रवाशांना बाहेर काढून त्यांची तपासणी करण्यात आली़ त्यानंतर गाडीचा एस ५ हा सॅनिटरायझरने स्वच्छ करून डबा सील केला़ तपासणीनंतर संबंधित प्रवाशांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सक्त सुचना देऊन सोडण्यात आल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.