माढ्यातील शौचालय घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करा ! सदाभाऊ खोत यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:51 PM2017-10-25T16:51:24+5:302017-10-25T16:51:33+5:30
मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
लऊळ दि २४ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने पंचायत समिती माढा समोरील दि १४ अॉगष्टपासुन सुरू असलेले कुर्डुतील शौचालयातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी करण्यात आलेले ठिय्या व घंटानाद आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचा ७२ वा दिवस होता. मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी वरवडे येथे जाण्यासाठी आले असता कुर्डूवाडी येथे आले़ त्यांनी उपोषणकर्त्या मोहन गायकवाड यांच्या उपोषणस्थळाला भेट दिली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांंना अनेक वेळा फोन लावूनही त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यावेळी खोत यांनी सीईओंचे स्वीय सहाय्यक यांना फोन लावला असता मी रजेवर आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर पंचायत समिती अधिकाºयांकडे त्यांनी जिल्हा परिषदेचा लँडलाईन नंबरही मागितला पण उपलब्ध झाला नाही. त्यावेळी ते संतापले. तब्बल अर्धा तासात अनेकवेळा मोबाईलवरुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोन घेतला नाही. यानंतर त्यांनी संबधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन उपमुख्य अधिकारी लोंढे यांना संबधित आदेश दिले. कुर्डू येथील पाच शौचालयापैकी चार शौचालय गायब असून उर्वरित एक तेही नादुरूस्त असल्याने त्याची चौकशी व्हावी व घरकुल,गटारी यामध्येही घोटाळा झाला असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोहन गायकवाड गेली ७२ दिवस ठिया आंदोलन करत होते. सदाभाऊ खोत यांनी ठिया आंदोलन करणा-या गायकवाड यांना पाणी देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले़ त्यामुळे आंदोलन संपले. आंदोलन संपल्यानंतर गायकवाड यांनी पंचायत समितीसमोर फटाक्याची आतिषबाजी केली़
फोटो ओळ : माढा पंचायत समितीसमोर ७२ दिवसांपासुन सुरू असलेले कुर्डु येथील शौचालय घोटाळ्यासंदभातील मोहन गायकवाड यांचे ठिया आंदोलन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने संपले़