जळोलीतील भावबंदकीच्या दरोड्याचा कट रचल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:45+5:302021-08-17T04:27:45+5:30
नरसाळे कुटुंबीय १८ सप्टेंबर २०२० रोजी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असल्याचा फायदा घेऊन रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ...
नरसाळे कुटुंबीय १८ सप्टेंबर २०२० रोजी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असल्याचा फायदा घेऊन रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. या चोरीचा शिताफीने तपास करून करकंब पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत पाटील यांनी यापूर्वीच ५ जणांना जेरबंद केले होते.
जेरबंद केलेल्या आरोपींकडून चोरीतील टीव्ही आणि ३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले होते. शिवाय गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे जप्त केली होती. पोलिसांना तपासात चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आल्याने तपास पुढे चालू ठेवला. यामुळे गुन्ह्यातील ६व्या (क्रमांक १) च्या आरोपीला २ जुलै रोजी अटक केली. असे असताना या घटनेत आणखी आरोपी असण्याची पोलिसांना शक्यता असल्याने तपासाचे सूत्र पुढे चालू ठेवल्याने गुन्ह्यातील कटात सामील असल्याच्या संशयावरून सिद्धेश्वर नरसाळे याला अटक केली आहे. त्याचाकडून आणखी काही माहिती हाती लागू शकते, याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सपोनि प्रशांत पाटील करीत आहेत.
चोरीतील मुद्देमाल मिळाला कान्हापुरीचा
जळोली येथील नागनाथ नरसाळे यांच्या घरी चोरी प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींकडून नरसाळे यांच्या चोरीतील किरकोळ मुद्देमाल हाती लागला. परंतु गुन्ह्याचा तपास करताना यातील आरोपींनी कान्हापुरी येथील प्रदीप देवकर यांची चोरी केल्याचे उघड झाले होते. शिवाय देवकर यांच्या चोरी प्रकरणातील १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने देवकर यांच्या ताब्यात देण्याची कामगिरी करकंब पोलिसांनी केली आहे.