सुस्तेत घाडगे गटाच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:33+5:302021-01-20T04:22:33+5:30
सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक अनंता चव्हाण, महादेव गावडे, तानाजी नागटिळक हे घाडगे गटातून बाहेर ...
सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक अनंता चव्हाण, महादेव गावडे, तानाजी नागटिळक हे घाडगे गटातून बाहेर पडल्याने व मतदारांमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. याचा फायदा विठ्ठल-भीमा परिवाराला झाला. श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीने निवडणुकीत एकही कॉर्नर सभा घेतली नाही. अतिशय साध्या पद्धतीने प्रचार करून व महिलांनी प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन हळदी-कुंकू लावून बदल घडवण्याचा प्रचार केला. चाळीस वर्षाचे सत्तापरिवर्तन झाल्याने सुस्ते गावात मुक्त गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला.
यावेळी तात्यासाहेब नागटिळक, तुषार चव्हाण, रामदास चव्हाण, माधव चव्हाण, धनंजय घाडगे, विजय नागटिळक, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष सुळे, गणेश बोबडे, एस. के. चव्हाण, संजय चव्हाण, संभाजी चव्हाण, अमोल चव्हाण, धनाजी शिंगण, अजिंक्य वाघमारे, संजय लोखंडे, अनंता चव्हाण, विकास चव्हाण, मुकुंद चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, देविदास वाघमारे, दत्तात्रय वायदंडे, संजय रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, मसू वाघमारे आदी उपस्थित होते.
सुस्ते येथील विजयी उमेदवार
विठ्ठल-भीमा परिवार पॅनलमधून राणी चव्हाण, विष्णू गावडे, स्नेहा बोबडे, उर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, तुषार चव्हाण, जुबेदा शेख, कांताबाई रणदिवे तर घाडगे गटाचे अनिल घाडगे, मनीषा कोळी, शकील तांबोळी, विशाल कसबे, दत्तात्रय बोबडे हे उमेदवार विजय झाले आहेत.
पराभूत झालेले उमेदवार
घाडगे गटाचे विद्यमान सरपंच बाळासाहेब लोकरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ललिता चव्हाण, मारूती शेजाळ, सुनंदा चव्हाण, मंगल चव्हाण, जोत्सना फडतरे, रेखा लोखंडे, राजाबाई सुळे तसेच विठ्ठल-भीमा परिवाराचे पांडुरंग कदम, जुबेदा शेख, आदम मुलाणी, अजिंक्य वाघमारे, बालाजी नागटिळक यांचा पराभव झाला आहे.