माढा तहसीलसमोर स्वाभिमानी संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:22+5:302020-12-11T04:49:22+5:30
या प्रकरणी कोणाची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करून, याबाबत नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी ...
या प्रकरणी कोणाची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करून, याबाबत नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
कुर्डूवाडीत पंचायत समितीच्या गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जमा झाले. त्यांनी टाकळी येथील प्रताप पिसाळ यांची म्हैस लसीकरणामुळे दगावली, असा आरोप करत उपोषणाला सुरुवात केली. यामुळे सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देत त्यांची बाजू ऐकत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितली व तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. विक्रांत बागल यांनी उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून याबाबत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु यावर उपोषणकर्ते चूक असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लगेच कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे मान्य केले. यात संबंधित कोणी दोषी असेल तर त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, संघटक सिद्धेश्वर घुगे, तालुकाध्यक्ष व शेतकरी प्रताप पिसाळ, रवींद्र सोनवणे, अजिनाथ सोलनकर, आप्पा जाधव, हनुमंत रूपनवर, भाऊसाहेब जरग, अंबादास जाधव, रामभाऊ लांडगे, हनुमंत कळसाईत यांनी सहभाग घेतला होता. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप व तालुकाध्यक्ष बालाजी जगताप यांनी पाठिंबा दिला.
फोटो ओळ
१०माढा उपोषण
माढा तहसीलसमोर आंदोलक कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विक्रांत बागल, आप्पासाहेब उबाळे आदी.