'स्वाभिमानी'चा आज सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:07 AM2018-11-11T10:07:40+5:302018-11-11T10:23:31+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन
सोलापूर - खासदार राजू शेट्टी आदेशानुसार सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गाळपास चाललेल्या उसाला पहिला हप्ता एफआरपी प्लस दोनशे प्रमाणे मिळावे या करिता आज सोलापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर विभाग अध्यक्ष महामूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली तुंगत,पंढरपुर येथे पप्पू पाटील व राजेंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली कामती,मोहोळ येथे बिळ्याने सिद्ध सुंटे यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुप, दक्षिण सोलापुर येथे चांद यादगिरी यांच्या नेतृत्वाखाली वडकबाळ, द.सोलापुर येथे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागणसूर अक्कलकोट येथे वजीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली मैंदर्गी अक्कलकोट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .
गेल्या गळीत हंगामातील उसाचा काही कारखान्यांनी पहिला हप्ता गेल्या दहा महिन्यांपासून दिलेला नाही. दिवाळीत शेतकऱ्यांना शिमगा करावा लागला .सरकार गांभीर्याने याकडे लक्ष देत नसल्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे .सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये महामूद पटेल यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येणार आहे .शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व कारखानदारांना ऊस बिल त्वरित जाहीर करण्यास भाग पाडावे अन्यथा पुढील करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी तीव्र आंदोलन करेल असााही इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.