ऊसबिले थकविणाऱ्यांविराेधात मंगळवेढ्यात स्वाभिमानीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:38+5:302021-09-21T04:24:38+5:30
मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम मिळावी या मागणीसाठी व एकरकमी मिळणारी एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या कायद्याविरुद्ध स्वाभिमानी ...
मंगळवेढा : तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम मिळावी या मागणीसाठी व एकरकमी मिळणारी एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या कायद्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
ऊस गाळपास आल्यानंतर साखर कारखानदारांनी १४ दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. दुसरा गळीत हंगाम सुरू होत आला तरी अद्यापपर्यंत ऊस उत्पादकांना गतवर्षीच्या एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. काही कारखान्यांनी कायद्याचे उल्लंघन करीत शेतकऱ्यांचे बिलाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत.
या कारखानदारांवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी व एफआरपीची थकीत रक्कम तात्काळ जमा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली.
यावेळी श्रीमंत केदार, दत्ता गणपाटील, दामोदर देशमुख, विजय खवतोडे, लक्ष्मण गायकवाड, नितीन नकाते, सोमनाथ बुरजे, प्रभू शिंदे, अर्जुन मुदगुल, सुनील मुढे, रवि गोवे, भारत नागणे, श्रीधर खांडेकर, ॲड. भारत पवार, हणमंत भुसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो : २० स्वाभिमानी
मंगळवेढा येथे धरणे आंदोलनप्रसंगी राहुल घुले, युवराज घुले, भारत नागणे, दामोदर देशमुख, विजय खवतोडे, लक्ष्मण गायकवाड, श्रीमंत केदार, श्रीधर खांडेकर.
200921\img-20210920-wa0031-01.jpeg
फोटो ओळी-- मंगळवेढा येथे धरणे आंदोलन प्रसंगी राहुल घुले, युवराज घुले, भारत नागणे,दामोदर देशमुख, विजय खवतोडे लक्ष्मण गायकवाड, श्रीमंत केदार, श्रीधर खांडेकर