सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘दूध बंद’ आंदोलन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:01 PM2018-07-16T14:01:28+5:302018-07-16T14:04:47+5:30

दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे.

Swabhimani's 'Milk Bandh' movement started in Solapur district | सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘दूध बंद’ आंदोलन पेटले

सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘दूध बंद’ आंदोलन पेटले

Next
ठळक मुद्देदरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टीदूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टीटेम्पो अडवून दूध पिशव्या रस्त्यावर टाकल्या

सोलापूर : दूध दरवाढ आणि शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या एल्गारच्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री अकरापासून रौद्ररूप धारण करीत आंदोलनाला सुरूवात केली. यामुळे आंदोलनाचा वणवा पेटून रात्रभर धगधगत सोमवारी दिवसभर दिसून आला़

खा. राजू शेट्टी यांनी पंढरीच्या विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले असले तरी कार्यकर्त्यांनी पांडुरंगाच्या दुग्धाभिषेकाआधीच आंदोलनाला सुरूवात करून आपला संताप व्यक्त केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर   खा. शेट्टी यांचे पावणेबारापर्यंत पंढरीत आगमन झाले नव्हते.  अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात पोलिसांनी कडक             बंदोबस्त ठेवला होता.

रिधोरे ता. माढा येथे स्वाभिमानीच्या अज्ञात  कार्यकर्त्यांनी दुधाची वाहतूक करणाºया  आयशर अडवून दूध पिशव्या रस्त्यावर टाकल्या आहेत तर दुधाची दरवाढ झाली पाहिजे आशा घोषणा देखील देण्यात आल्या तर काही नागरिकांना  वाटण्यात देखील आल्या आहेत. यावेळी  २० ते २५ कार्यकर्ते उपस्थित होते.

महुद (ता. सांगोला) येथील शेतकºयांनी मुख्य चौकात रस्त्यावर  दूध ओतून आंदोलन सुरू केले. रिधोरे (ता. माढा) येथे स्वाभिमानीच्या अज्ञात कार्यकर्त्यांनी दुधाची वाहतूक करणारा टेम्पो अडवून दूध पिशव्या रस्त्यावर टाकल्या आणि फोडल्याही. एवढ्यावरच न थांबता काही कार्यकर्त्यांनी टेम्पोची तोडफोडही केली. 

दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी उद्या १६ जुलै पासून पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे. दरम्यान, थेट शेतकºयांच्या खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी यांनी रविवारी मध्यरात्री विठ्ठल -रुक्मिणीचे दर्शन घेऊन नामदेव पायरीपासून दूध बंद आंदोलनाला प्रारंभ केला. दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान शेतकºयाच्या खात्यावर जमा करावे किंवा दूध संघांनी प्रतिलिटर ५ रुपये दर  वाढवून द्यावा ही मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूध बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या आंदोलनामुळे वाहनांचे होणारे नुकसान, दुधाची होणारी नासाडी पाहता खासगी संघांनी उद्यापासून दुधाला सुट्टी घेण्याच्या सूचना गावोगावच्या संकलन करणाºया डेºयांना दिल्या आहेत. रविवारी संध्याकाळी सायंकाळचे दूध रात्री १२ पूर्वी डेरीच्या मुख्य कार्यालयात पोहोच होईल अशा पद्धतीने नियोजन केले होते. यामुळे पश्चिम महाराष्टÑातील सर्व खासगी दूध संघाचे दूध उद्या (दि. १६) बंद  राहणार आहे. याबाबत लेखी कसलाही आदेश नसलातरी तोंडी सूचनांद्वारे दूध गोळा करु नये असे सांगण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यात दूध पावडर उत्पादकांना ३ रुपयांचा दर वाढवून दिला असला तरी त्यांना शासनाचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याचा फायदा शेतकºयांना होणार नाही. शेतकºयाच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये जमा करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
- खासदार राजू शेट्टी

आम्ही दूध मागणार नाही. आलेले दूध आम्ही स्वीकारणार आहोत. मात्र नुकसान सहन करुन दूध गोळा करणार कोण असाही प्रश्न आहे. त्यामुळे दुधाला ही अघोषित सुट्टीच आहे. 
- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध संघ, इंदापूर

Web Title: Swabhimani's 'Milk Bandh' movement started in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.