मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:27+5:302021-07-14T04:25:27+5:30
कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केशरी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा ...
कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केशरी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा करून दोन महिने झाले तरी मंगळवेढा तालुक्यात अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू केली नाही. तरी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी तालुक्यातील केशरी कार्डधारकांना तत्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा तहसील कार्यालयात थाळी मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, शहराध्यक्ष डोरले, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन मुद्गुल, संजय मुद्गुल, रवी गोवे, कैलास कोळी, चंद्रशेखर राजमाने, हरी भाऊ घुले, सचिन शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::::
मंगळवेढा तहसीलसमोर धरणे आंदोलनप्रसंगी जिल्हा संघटक युवराज घुले, ॲड. राहुल घुले, शहराध्यक्ष डोरले, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन मुदगुल, संजय मुदगुल, रवी गोवे, कैलास कोळी, चंद्रशेखर राजमाने, हरी भाऊ घुले, सचिन शिंदे आदी.
130721\20210713_151119.jpg
फोटो ओळी--मंगळवेढा तहसीलसमोर धरणे आंदोलन प्रसंगी थाळ्या वाजवून शासनाचा निषेध करताना जिल्हा संघटक युवराज घुले , ऍड राहुल घुले,
शहराध्यक्ष डोरले, लक्ष्मण गायकवाड ,अर्जुन मुदगुल, संजय मुदगुल ,रवी गोवे, कैलास कोळी, चंद्रशेखर राजमाने, हरी भाऊ घुले, सचिन शिंदे