अक्कलकोटच्या स्वामी भक्तांना ऑनलाइनवर मोफत महाप्रसाद बुकिंग करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 09:25 AM2021-02-17T09:25:35+5:302021-02-17T09:26:42+5:30

कोरोनामुळे मंदिर समितीने घेतला निर्णय; भाविकांच्या वेळेत बचत होणार

Swami devotees of Akkalkot will be able to book Mahaprasad online for free | अक्कलकोटच्या स्वामी भक्तांना ऑनलाइनवर मोफत महाप्रसाद बुकिंग करता येणार

अक्कलकोटच्या स्वामी भक्तांना ऑनलाइनवर मोफत महाप्रसाद बुकिंग करता येणार

googlenewsNext

चपळगाव : सध्या जगात सर्वत्र चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे आणि स्वामीभक्तांच्या वाढती गर्दी पाहता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादास येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी मोफत ऑनलाईन महाप्रसाद बुकिंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. ही व्यवस्था संपूर्णतः मोफत असून त्याचा लाभ सर्व स्वामी भक्त घेऊ शकणार आहेत.

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी माहिती देताना सांगितले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सन १९८८ पासून अक्कलकोटात येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढतच चालला आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला सुरू केलेल्या अन्नछत्राचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले. भक्तांच्या सोयीसाठी रांगेतून नियोजन सुरू झाले आणि प्रत्येक पंगत संपून पुढची पंगत सुरू होईपर्यंत भक्तांना उभे राहावे लागते.
ह्या सर्व बाबींचा विचार करून, न्यासाने असा निर्णय घेतला की, प्रत्येक पंगतीच्या काही जागा राखीव ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग करणाऱ्यांसाठी ठेवाव्यात आणि त्यानुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आम्ही ऑनलाइन महाप्रसाद बुकिंगची सोय सर्व भक्तांसाठी केलेली आहे.

ज्यामुळे सर्व स्वामी भक्तांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्यांच्या वेळेचे नियोजन नेमकेपणाने करता येईल, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळ आणि महाप्रसादाची वेळ यांची सांगड योग्य रीतीने घालता येईल. अशा सर्व बाबींना गृहीत धरून न्यासाच्या वतीने  सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेचा लाभ घ्यावेत व या योजनेची माहिती अक्कलकोटास नजीकच्या काळात येऊ इच्छिणाऱ्या स्वामी भक्तांनाही द्यावी असे भोसले यांनी सांगितले.
सदरचे न्यास हे विविध उपक्रम राबविण्यामध्ये राज्यात अग्रेसर असून, स्वामी भक्तातून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन देखील काटेकोरपणे करण्यात येते. कोविड १९च्य पार्शवभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी न्यासाकडून होत आहे.
----------------------------
१० जणांसाठी ऑनलाईन बुकिंग : वरील सेवा पूर्णतः मोफत असेल. ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तसेच एकावेळेस जास्तीत जास्त १० जणांसाठी ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करता येईल.

---------------------
ऑनलाईन महाप्रसाद बुकिंगची प्रक्रिया :
1) www.swamiannacchatra.org  ह्या वेबसाईटवर जाऊन तिथे असलेल्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग ह्या बटणला क्लिक करावेत.
2) त्या नंतर पुढील ३ महिन्यासाठीच्या तारखांचे विवरण दिसेल.
3) त्या कॅलेंडर वरील आपल्याला ज्या तारखेसाठी महाप्रसाद घ्यावयाचे आहे त्या तारखेवर क्लिक करावे.
4) नंतर येणारा फॉर्म भरावा आणि submit करावेत.
5) फॉर्म submit केल्यावर आपणास एक QR code मिळेल, तो डाऊनलोड करावा आणि तो QR code प्रवेशावेळेस प्रवेशद्वारावर दाखवावे.

Web Title: Swami devotees of Akkalkot will be able to book Mahaprasad online for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.