नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!

By संताजी शिंदे | Published: October 26, 2023 05:16 PM2023-10-26T17:16:36+5:302023-10-26T17:16:53+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे

Swami Ramanand Tirtha Marathwada University of Nanded Vice-Chancellor Dr. Appointment of Prakash Mahanavar! | नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!

सोलापूर:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे कुलपती रमेश बैस यांनी नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वीकारावा, असा आदेश काढलेला आहे. ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील सहा महिने अथवा नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत डॉ. प्रकाश महानवर हे नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार पाहतील असे आदेशात म्हटले आहे. कुलपती  रमेश बैस यांनी दिलेली जबाबदारी निश्चितच समर्थपणे पार पाडेन, असे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी म्हटले आहे.

Web Title: Swami Ramanand Tirtha Marathwada University of Nanded Vice-Chancellor Dr. Appointment of Prakash Mahanavar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.