भाविकांविना स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:03+5:302021-04-15T04:21:03+5:30

सध्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असल्याने मंदिर ...

Swami Samarth Maharaj's Revelation Day ceremony without devotees | भाविकांविना स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा

भाविकांविना स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा

Next

सध्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असल्याने मंदिर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी व मोजके सेवेकरी वगळता अन्य कोणत्याही भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. दरम्यान मंदिरातील श्रींचे नित्योपचार व आरती नियमितपणे सुरू होती. १४ एप्रिल रोजी स्वामी प्रकट दिनानिमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थित करण्यात आली. यानंतर प्रभात फेरीची अनेक वर्षांची परंपरा यंदा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित केल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली.

दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभारा मंडपात पुरोहित मंदार पुजारी व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गुलाल, पुष्प वाहून, भजन गीताने पाळणा कार्यक्रम पार पडला. यानंतर श्रींची नैवेद्य आरती झाली. अशा प्रकारे यंदा कोरोनाच्या सावटाखाली प्रकट दिन सोहळा भाविकांविना साध्या पद्धतीने पार पडला. याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वला सरदेशमुख, कौसल्या जाजू, रामचंद्र समाणे, बाळासाहेब घाटगे, मल्लीनाथ स्वामी, प्रथमेश इंगळे, श्रीपाद सरदेशमुख, राजेश निलवाणी, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सागर गोंडाळ उपस्थित होते.

कोट ::::::::

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेक भाविकांना स्वामी दर्शनापासून वंचित रहावे लागत असल्याची खंत आहे. या कोरोना संक्रमणाशी लढण्यासाठी प्रत्येकास स्वामी समर्थांनी बळ द्यावे व लवकरात लवकर या जागतिक संकटातून सुखरूपरित्या तारून घ्यावे अशी प्रार्थना स्वामी चरणी केली आहे.

- महेश इंगळे,

चेअरमन मंदिर समिती

मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त कोल्हापूर येथील स्वामी समर्थ लाईट डेकोरेटर्स यांच्या वतीने अविनाश सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वटवृक्ष मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे मंदिर परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.

फोटो

१४अक्कलकोट-स्वामी समर्थ प्रकट दिन

ओळ

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जन्मोत्सव पाळणा कार्यक्रमप्रसंगी मंदार महाराज, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य.

Web Title: Swami Samarth Maharaj's Revelation Day ceremony without devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.