स्वामी समर्थ मंदिर बंद; भाविकांविना होणार प्रगट दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:11+5:302021-04-07T04:23:11+5:30
अक्कलकोट : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अक्कलकोट तीर्थक्षेत्र अर्थात स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार ३० ...
अक्कलकोट : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अक्कलकोट तीर्थक्षेत्र अर्थात स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या काळात ‘श्री’ना नित्यनियमाने केले होणार आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार ५ एप्रिल रोजी रात्री शेजारतीनंतर स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, नित्यनियमाने केले जाणारे पहाटेची काकड आरती, दुपारचा नैवेद्य, आरती, रात्रीची शेजआरती यासह नित्याने होणार आहे. पौरोहित्य, विश्वस्त, कर्मचारी केवळ यांच्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाच्या आदेशानंतर घेण्यात आला आहे.
---
---
दीडशे वर्षात दुसऱ्यांदा वेळ
१४ एप्रिल हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन म्हणून पाळला जातो. या उत्सव दिवशी पाळणा कार्यक्रम असणार आहे. त्या दिवशी सुद्धा केवळ पौरोहित्य व विशवस्त, सेवेकरी यांच्या मोजक्या लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. भक्ताविना प्रकटदिना होणे हे १५० वर्षातील सलग दुसरे वर्ष ठरले आहे. १३ एप्रिल रोजी गुडीपाडवा आहे. त्याही दिवशी भक्ताविना धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
----
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. ३० एप्रिल पर्यंत स्वामी समर्थ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. भक्तांनी बंद काळात स्वत:च्या घरी बसून आराधना करावी. धार्मिक कार्यक्रम विश्वत, सेवेकरी अशा मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार आहे.
- महेश इंगळे, स्वामी समर्थ मंदिर समिती अध्यक्ष
---
०६ अक्कलकोट
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वामी समर्थ मंदिर बंद ठेवण्यात आले आहे