तारापुरातील गुजेंगावकर पती-पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:37 PM2017-07-20T12:37:39+5:302017-07-20T12:37:39+5:30

तारापुरातील गुजेंगावकर पती-पत्नीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

Swan Flu infection of Gajengavkar husband and wife in Tarapu | तारापुरातील गुजेंगावकर पती-पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

तारापुरातील गुजेंगावकर पती-पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

Next

ऑनलाइन लोकमत

सुस्ते, दि. 20-  पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील प्रफुल्ल गुजेंगावकर (वय 50 वर्षे) व त्यांची पत्नी वासंती गुजेंगावकर (वय 46वर्षे) या दांपत्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. यामुळे सुस्ते परिसरातील सुस्ते, तारापूर, मगरवाडी, विटे, पोहोरगांव, तुगंत व खरसोळी आदीगावांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या त्या दोघांवर सोलापूर येथील अश्विन रूग्णालयात 16 जुलै पासून अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा रोहीत गुजेंगावकरने याने दिली आहे. प्रफुल्ल रामलिंग गुजेंगावकर हे सुस्ते येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत वरिष्ठ क्लार्क या पदावर कार्यरत आहेत. गुजेंगावकर दांपत्ये आषाढी यात्रेला पंढरपूर गेले होते. पंढरपूरहून आल्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या फरकाने त्यांना सर्दी खोकला व तापाची लक्षणे दिसून येवू लागली. खाजगी दवाखान्यात उपचार घेतले असता फरक पडला नसल्याने रक्त लघवी तपासणी केली असता त्यांना या रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. गुजेगावकर दांपत्यांना या रोगाची लागण झाल्याचे सर्वश्रूत असतानादेखील याठिकाणाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा दवाखाना सदा बंद असल्याचा प्रत्यय तारापूर गावात पहावयास मिळाला. गेल्या क्रित्येक दिवसांपासून येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इमारतीला कायम कुलूप असल्याचे दिसून येते आहे.

Web Title: Swan Flu infection of Gajengavkar husband and wife in Tarapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.