स्वप्नील कृपाळची एन. डी. ए. परीक्षेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:21+5:302021-01-15T04:19:21+5:30
अनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२०च्या एन. डी. ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)च्या परीक्षेत स्वप्नील मल्लिकार्जुन कृपाळ याने ...
अनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२०च्या एन. डी. ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)च्या परीक्षेत स्वप्नील मल्लिकार्जुन कृपाळ याने यश मिळवले. या यशाबद्दल त्याचा माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते अनगर येथे सत्कार करण्यात आला. अतिशय सामान्य आणि शेतकरी कुटुंबातील या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांने मिळवलेल्या यशाचे आमदार पाटील यांनी कौतुक केले.
स्वप्नीलचे पूर्व प्राथमिक शिक्षण वाफळेतील जिल्हा परिषद शाळेत तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनगरच्या स्व. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयात झाले आहे. सध्या तो दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे शिक्षण घेत आहे. यापूर्वी वाफळेच्या अजिंक्य दाढे या विद्यार्थ्यानेही या परीक्षेत यश मिळवले आहे.
यावळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, पांडुरंग थिटे, हरी गुंड, मल्लिकार्जुन कृपाळ, किसन गुंड, माधव खरात, सत्यवान दाढे, समाधान डोंगरे, महेश टिंगरे, बापू ऐतवाडे उपस्थित होते.
---
फोटो : १४ अनगर
वाफळेच्या स्वप्नील कृपाळची एनडीए परीक्षेत निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजन पाटील यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी पांडुरंग थिटे, प्राचार्य चंद्रकांत ढोले, माधव खरात उपस्थित होते.