खोत यांच्या मताधिक्याने स्वाभिमानी सरसावली
By admin | Published: May 18, 2014 12:15 AM2014-05-18T00:15:29+5:302014-05-18T00:15:29+5:30
येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून करमाळ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यासाठी आग्रह धरला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सुभाष परदेशी यांनी सांगितले.
करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून माढा लोकसभा निवडणूक लढविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना १५ हजारांचे मताधिक्य मिळाले असून, या जोरावरच येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून करमाळ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यासाठी आग्रह धरला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सुभाष परदेशी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातून राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी सर्वच गटातटाचे नेतेमंडळी एक त्र आलेली असताना गेल्या तीन वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले काम, तालुक्यातील प्रत्येक गावात संघटनेची ताकद तयार झालेली आहे. तालुक्यातील जनता आता नव्या उमेदवाराच्या शोधात असून, गटाच्या राजकारणात तालुक्यातील तीनही गट स्वत:च्या स्वार्थासाठी अभद्र युती करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातून सदाभाऊ खोत यांना मिळालेले मताधिक्य पाहता करमाळा विधानसभेची जागा महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेस सोडावी यासाठी करमाळ्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे सुभाष परदेशी यांनी सांगितले.