Beraking; सोलापुरात स्वीट मार्ट चालकास दंड; नव्या नियमाचा पहिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:43 PM2020-10-07T15:43:07+5:302020-10-07T15:44:51+5:30

Now add 'Expiry Date' to open sweets too! सोलापूर लोकमत ब्रेकींग

Sweet mart driver fined in Solapur; The first bump of the new rules | Beraking; सोलापुरात स्वीट मार्ट चालकास दंड; नव्या नियमाचा पहिला दणका

Beraking; सोलापुरात स्वीट मार्ट चालकास दंड; नव्या नियमाचा पहिला दणका

googlenewsNext

सोलापूर : स्वीट मार्ट दुकानात असलेल्या दुग्धजन्य पदार्थावर बनावटीची तारीख न लिहिल्याबद्दल विजापूर रोडवरील स्वामी समर्थ स्वीट मार्ट या दुकानदारास ७ हजार रूपयाचा दंड ठोठावल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी लोकमत शी बोलताना दिली.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाºया खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०२० पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाह्य (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक होते, मात्र सोलापुरातील बºयाच स्वीट मार्ट दुकानात याबाबतची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या.

त्यानुसार शहरातील ४३ दुकानांची अचानकपणे पाहणी केली. त्यापैकी विजापूर रोडवरील स्वामी समर्थ स्वीट मार्ट व अन्य एका दुकानदाराने नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले़ त्यापैकी एका दुकानादारावर दंडाची कारवाई करून एका दुकानदारास नोटीस बजावल्याचे राऊत यांनी सांगितले.

Web Title: Sweet mart driver fined in Solapur; The first bump of the new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.