अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:10 AM2024-08-29T09:10:23+5:302024-08-29T09:10:32+5:30

संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. 

Sweetness of Subsidy Proposals of 590 new milk institutions | अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव

अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव

अरुण बारसकर, लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुपटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मागील अनुदानाला मुकलेल्यांसह राज्यातून ८०४ दूध संस्थांना लाॅगीन आयडी देण्यात आला आहे. 

राज्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याचा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी राज्यातून १८ जिल्ह्यांतील २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. त्या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. 

जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी प्रति लीटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २३ जिल्ह्यांतील ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत.

शासन ते शेतकरी अशी दूध अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी ते मार्चच्या अनुदानासाठी २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव आले आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदानाची रक्कम राज्यात प्रथमच जमा होत आहे. 
- प्रशांत मोहोड,
आयुक्त, दुग्ध विकास

जानेवारी ते मार्च - ऑगस्ट ते ऑक्टोबर दाखल प्रस्ताव
पुणे (३२ — ८१), सातारा (२४ — ५८), सोलापूर (१८ — ८९), कोल्हापूर (१२ — ००), सांगली (१२ — ३०), नागपूर (०३ — ०४), गोंदिया (०० — ०१) , वर्धा (०० — ०१),  भंडारा (०२ — ०२), अहमदनगर (७४ — १६०), जळगाव (०२ — १२), नाशिक ( १८ — ५२), धुळे (०३ — ०९), बीड (०६ — १२), छ. संभाजीनगर (१२—२२), धाराशिव (१३ — ३३), जालना (०१ —०४), लातूर (०१ — ०६), नांदेड (०० — ०४), परभणी (०० — ०४), अमरावती (०० — ०२), बुलढाणा ( ०२ — ०२), यवतमाळ (०० — ०२).
एकूण — २४४ — ५९० 

Web Title: Sweetness of Subsidy Proposals of 590 new milk institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.