बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून वृद्धेला साडेसहा लाखाला फसवले; गुन्हा दाखल

By रूपेश हेळवे | Published: May 20, 2023 03:47 PM2023-05-20T15:47:29+5:302023-05-20T15:47:43+5:30

या प्रकरणी आरोपी कय्युम शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई भोईटे करत आहेत.

swindled an old man of six and a half lakhs by asking him to invest money in a construction business; Filed a case | बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून वृद्धेला साडेसहा लाखाला फसवले; गुन्हा दाखल

बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून वृद्धेला साडेसहा लाखाला फसवले; गुन्हा दाखल

googlenewsNext

सोलापूर : बांधकाम व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो मिळवून देतो असे सांगून वृध्द दांपत्याकडून घेतलेले ६ लाख ५५ हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कय्युम इब्राहिम शेख ( रा. बॉम्बे पार्क) यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुहासिनी सुधीर कुलकर्णी ( वय ७२, रा. वसंत विहार) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी शेख याने फिर्यादी कुलकर्णी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करून घेत बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परताना मिळवून देऊ असे अश्वासन दिले. यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडे ८ लाख २० हजार रुपये गुंतविले.

आरोपीने फिर्यादींना त्यातील १ लाख ६५ हजार रुपये परत दिले. उर्वरित रक्कम म्हणजेच ६ लाख ५५ हजार रुपयाचा न वटणारा चेक दिला. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी शेख याने मला पैसे मागायचे नाहीत, पैसे मागितल्यास जीवे ठार मारतो अशी धमकी दिली. या प्रकरणी आरोपी कय्युम शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई भोईटे करत आहेत.

Web Title: swindled an old man of six and a half lakhs by asking him to invest money in a construction business; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.