केक कापण्यासाठी तलवार तळपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:31+5:302021-07-24T04:15:31+5:30
सातजणांविरुद्ध केस डायरीत नोंदली अक्कलकोट : दोघा जानीजिगर मित्रांचा वाढदिवस वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी आणि ते तलवारीने केक कापून साजरा ...
सातजणांविरुद्ध केस डायरीत नोंदली
अक्कलकोट : दोघा जानीजिगर मित्रांचा वाढदिवस वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी आणि ते तलवारीने केक कापून साजरा करण्याचा धक्कादायक प्रकार नागणसूर (ता. अक्कलकोट) येथे उघडकीस आला. १ ते ८ जुलै दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी बड्डेबायसह सातजणांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग व कोविड संसर्ग वाढू नये यासाठी भंग केल्याबद्दल गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नागणसूर येथे १ जुलै रोजी तोहीर शेख आणि ८ जुलै रोजी जुबेर फुटाणगर यांचा वाढदिवस होता. या दोन्ही वेळेस सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या आदेशाचा भंग केला.
या दोन्ही घटनेस जबाबदार धरून रफिक होटगी, तोहीर शेख, हैदर मुल्ला, आदम उस्ताद, जुबेर फुटाणगर, अन्सर पट्टेवाले, सैपन बिरादे (सर्व रा.नागणसूर) यांच्यावर गुन्हा नोंदला आहे. याबाबत हवालदार सुरेशकुमार जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास फौजदार काळे करीत आहेत.
----