राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची महूदमध्ये गाढवावरून धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:02+5:302021-08-25T04:28:02+5:30
सांगोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महूद येथे शिवसेनेच्या वतीने ...
सांगोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महूद येथे शिवसेनेच्या वतीने मुख्य चौकातून नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे घेऊन राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध नोंदवला. यावेळी शिवसेनेचे नितीन वडे, शहरप्रमुख अस्लम मुलाणी, संतोष खडतरे, गणेश कांबळे, युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना तालुकाध्यक्ष सुभाष भोसले, संतोष पवार, अंकुश पवार, नवनाथ खडतरे, नवनाथ पवार उपस्थित होते.
-----
फोटो : २४ सांगोला
महूद येथे शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. यावेळी सूर्यकांत घाडगे, शहर प्रमुख अस्लम मुलाणी, शंकर मेटकरी, सुभाष भोसले.