तडवळेचा शरण कांबळे यूपीएसपी परीक्षेत देशात आठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:48+5:302021-02-06T04:40:48+5:30

त्याचे इंजिनिअरिरंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी टेक केले. पुढील शिक्षण बेंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची ...

Tadwale's Sharan Kamble Remember the country in the UPSP exam | तडवळेचा शरण कांबळे यूपीएसपी परीक्षेत देशात आठवा

तडवळेचा शरण कांबळे यूपीएसपी परीक्षेत देशात आठवा

Next

त्याचे इंजिनिअरिरंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी टेक केले. पुढील शिक्षण बेंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीद्वारे वीस लाखाचे पॅकेज देऊ केले होते, त्याने ते नाकारले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. ऑगस्ट २०१९मध्ये पहिल्यांदाच परीक्षा दिली आणि तो सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिर्झव्ह पोलीस फोर्स, सेंट्रल इंडी स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल या दलामध्ये निवड केली जाते.

निकाल ऐकताच फटाक्याची आतषबाजी

शरण कांबळेचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी कष्टाच्या जोरावर मुलाला क्लासवन बनविले. शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

फोटो

०५शरण कांबळे-यश

Web Title: Tadwale's Sharan Kamble Remember the country in the UPSP exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.