कर्जदार महिलेचा टाहो; आजारी पतीसाठी मंगळसूत्र विकले; बचत गटाचा तगादा थांबवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 01:03 PM2020-06-26T13:03:44+5:302020-06-26T13:06:57+5:30

खासगी फायनान्स कंपन्यांचा राऊत नगरातील महिलांमागे वसुलीचा भुंगा

Tahoe of the debtor woman; Sold mangalsutra for sick husband; Stop the self-help group | कर्जदार महिलेचा टाहो; आजारी पतीसाठी मंगळसूत्र विकले; बचत गटाचा तगादा थांबवा 

कर्जदार महिलेचा टाहो; आजारी पतीसाठी मंगळसूत्र विकले; बचत गटाचा तगादा थांबवा 

Next
ठळक मुद्देमीनाक्षी राठोड असे पतीसाठी सौभाग्याचं लेणं विकणाºया बचत गट कर्जदार महिलेचे नाव आहेमजरेवाडी परिसरात मार्कं डेय शाळेच्या परिसरात राऊत नगरमध्ये मजूरवर्ग राहतोसध्या कुठेही काम नाही. कोणी कामही देत नाही, मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा प्रश्न असताना फायनान्स कंपन्यांचा तगादा लागला आहे

सोलापूर : ‘औषधपाण्याला आता पैसा नाही... आजारी पतीच्या उपचारासाठी गळ्यातले मंगळसूत्र विकावे लागले़... परिस्थिती हलाखीची आहे़़़ बचत गटाचा तगादा थांबवा हो...’ हा आर्थ टाहो आहे राऊत नगरमधील एका बचत गटाच्या कर्जदार महिलेचा. 

मीनाक्षी राठोड असे पतीसाठी सौभाग्याचं लेणं विकणाºया बचत गट कर्जदार महिलेचे नाव आहे. मजरेवाडी परिसरात मार्कं डेय शाळेच्या परिसरात राऊत नगरमध्ये मजूरवर्ग राहतो. या नगरातील बहुतांश महिला रोजंदारीचे काम करतात. कोणी धुणीभांडी करते तर कुणी भाजी विकते़ त्यापैकीच मीनाक्षी राठोड या एक़ काही दिवसांपूर्वी पतीच्या कानाखाली गाठ झाली. ती काढण्यासाठी पैसे नव्हते. गळ्यातले मंगळसूत्र विकून व्याजाने पैसे आणले आणि औषधोपचारावर खर्च केला. सध्या कुठेही काम नाही. कोणी कामही देत नाही. मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा प्रश्न असताना फायनान्स कंपन्यांचा तगादा लागला आहे.

या भागात जवळपास शंभर महिलांचा एक गट असून वेगवेगळे बचत गट स्थापन करून काही लघु आर्थिक संस्थांनी त्यांना कर्ज वाटप केले आहे. सहा महिन्यात कर्जापोटी काही हप्ते वसूल झाले आहेत. लॉकडाऊननंतर अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. बचत गटांचा उद्योगही बंद आहे़ हप्ते भरण्यात अनेक अडचणी आहेत. रिझर्व्ह बँकेने कर्ज दिलेल्या आर्थिक संस्थांना कोरोना काळात तीन महिने हप्ते वसुली थांबवण्याचे आदेश दिले असतानाही कर्जदार महिलांमागे तगादा लागलेला आहे. १५ दिवसात या भागातील अनेक कर्जदार महिलांना फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींचा व्याज आणि हप्ता भरण्यासाठी सकाळी फोन येतो. कर्जाचे हप्ते फेडा; अन्यथा चक्रवाढ व्याजासह रक्कम वसूल करु, अशा वरच्या स्वरात तगादा लावला जात आहे. लवकरात लवकर आमचा तगादा थांबवावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.


आर्थिक संस्थांकडून महिलांना लुबाडण्याचे काम सुरू
बºयाच महिलांना कर्ज घेताना रक्कम पूर्ण दिली जात नाही. आरोग्याचा विमा आणि इतर कारणाखाली काही रक्कम कपात करतात़ राऊत नगरमधील महिलांना आरोग्याचा विमा म्हणून कर्ज देताना सोळाशे रुपये कपात केल्याचे सांगण्यात आले. या काळात काही लोक आजारी होते, त्यांना कोणत्याही स्वरूपाची मदत या बचत गटाकडून मिळालेली नाही. अशिक्षित, निरक्षरपणाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचे काम काही आर्थिक संस्था करताहेत़

कुटुंबाला आधार असलेला सलून व्यवसाय बंद आहे. धुणीभांडी आणि इतर किरकोळ कामेही बंद आहेत. मार्च महिन्यात मला हृदयविकाराचा त्रास झाला़ अँजिओग्राफीसाठी खर्च आला. आम्ही पैसे बुडवत नाही, पण मुदत मागतोय. सकाळी-सकाळी या कंपन्यांचे फोन येतात. पैशासाठी तगादा लावला जातो़ 
- सुनंदा गंगधरे
बचत गट कर्जदार महिला

अनेक अडचणींमुळे बचत गटाने कर्ज घेतले आहे़ आम्हाला सध्या घरकामही कोणी देत नाही़ रोजीरोटी थांबली आहे, अशा परिस्थितीत बचत गटांना लावलेला तगादा अर्थिंक संस्थांनी थांबवावे़ पतीसाठी मंगळसुत्र विकल्याची कीव त्यांना येत नाही, शासनाने तीन महिने वसुली थांबविण्याचे सांगितले असतानाही वसुली सुरूच आहे़
- मीनाक्षी राठोड, कर्जदार महिला

Web Title: Tahoe of the debtor woman; Sold mangalsutra for sick husband; Stop the self-help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.