ताई, माई मास्क वापरा, हात धुवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:02+5:302021-03-28T04:21:02+5:30
मोहोळ : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत पाटकुल येथे शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका यांनी ...
मोहोळ : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत पाटकुल येथे शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेविका यांनी गृहभेटी देऊन कोरोनाविषयक जनजागृती केली. ताई, माई मास्क वापरा, हात धुवा, विनामास्क कोणालाही दुकानात प्रवेश देऊ नका, असे आवाहन जनजागृती रॅलीदरम्यान करण्यात आले.
सरपंच शिवाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली. कोमार्बिड सर्वेक्षण, कोरोनाकाळात घ्यावयाची काळजी, कोरोना चाचणी व लसीकरणासाठी आधार कार्ड लिंक करणे याबाबत मुख्याध्यापक नंदकुमार वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गृहभेटीतून शिक्षकांनी मार्गदर्शन केले. लसीकरणासाठी पाटकुल प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिंदुराव काळे यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात शिक्षक दत्तात्रय चौधरी, संतोष साठे, अतुल क्षीरसागर, नंदलाल नरवणे, गणेश वाघमारे, संगीता वसेकर, बा. ज्ञा. मेलगे, सुजाता दीक्षित, रूपाली गायकवाड, रूपाली माळी, काझी , आशा सेविका सुनंदा कोळी, संगीता सातपुते, अर्चना काटे, प्रियंका काटे, रंजना टोणपे , वनिता ननवरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस रंजना घोडके, नीलावती राऊत, शीतल साळुंखे, अपर्णा गोपीनंदन,शेलार, घोडके, सारिका गवळी, भोसले, काळे, केसकर हे सहभागी झाले होते.
----
२७ पाटकूल
कोरोना आणि लसीकरणाबाबत प्रबाेधन करताना शिक्षक.