ताई, तुम्ही चुकलात.. तुम्हाला प्रसिद्धीची काय गरज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:11+5:302021-09-25T04:22:11+5:30
कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून कीर्तनसेवा ...
कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून कीर्तनसेवा करत आहेत. आजवर १० हजारांहून अधिक कीर्तनांचा टप्पा त्यांनी पार केलाय. खास करून तरुण पिढीचं नेतृत्व करणाऱ्या शिवलीला तरुणांसाठी समाज प्रबोधनाचं काम करतात. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता शिवलीला यांच्या कीर्तनाच्या जादूने स्पर्धकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. शिवलीला यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री करताच शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारल्या.
मात्र एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कीर्तनकार यांनी या वादग्रस्त शोमध्ये सहभाग घ्यावा की नको, यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यामध्ये बहुतांश जणांनी त्यात सहभागी होऊ नये, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता शिवलीला पाटील याबाबत काय निर्णय घेणार, याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.
........
२४शिवलीला पाटील