खोटे कागदपत्र देणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:48+5:302021-09-18T04:23:48+5:30
तक्रारदार खाशीम सैपन शेख यांची चप्पळगाव येथे ग्रामपंचायत जागेत सन-२०१४ पासून रीतसर भाडे पट्टे करार करून दुकान कार्यरत आहे. ...
तक्रारदार खाशीम सैपन शेख यांची चप्पळगाव येथे ग्रामपंचायत जागेत सन-२०१४ पासून रीतसर भाडे पट्टे करार करून दुकान कार्यरत आहे. आजपर्यंत रीतसर भाडे ग्रामपंचायतकडे भरत आलेले आहे. गेल्या आठवड्यात काही गावगुंडांनी ती जागा सोड, असे म्हणून रात्रीच्या वेळी दुकानाची तोडफोड करून मारहाण करून गल्ला पळविल्याची तक्रार उत्तर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तेव्हापासून या घटनेतील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी सोलापूर कोर्टात अर्ज दाखल केले आहेत. मात्र ते कोर्टाने फेटाळले आहे. पुन्हा अर्ज ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना जमीन मिळण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने आरोपींना खोटे कागदोपत्र देण्यात आले आहेत. तरी त्याची योग्य ती खातेनिहाय चौकशी करून ग्रामविकास अधिकारी कोळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
.................
सदर व्यक्ती २०१४ मध्ये करार केलेले खरी आहे. त्यांनी भाडे भरलेले नाही. व्यवसाय कर भरलेले आहे. तशाच पद्धतीने दाखला दिलेला आहे.
- एस. बी. कोळी, ग्रामविकास अधिकारी