मुलांना सांभाळा; सर्दी, खोकला, ताप बळावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:56+5:302021-08-20T04:26:56+5:30
ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. खासगी व शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे. दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत ...
ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. खासगी व शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे. दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सततच्या ढगाळ वातावरण, रिमझिम पावसामुळे साथीचे आजार बळावत आहेत. अंगदुखीचेही रुग्ण वाढत आहेत. डोकेदुखी, अंगदुखी, ताप, खोकल्यामुळे नागरिक बेजार झाले. अशुद्ध पाणी, अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच डेंग्यू फैलावत आहे.
........
चौकट-
कोरोना व डेंग्यूची लक्षणे सारखीच
तालुक्यात डासांपासून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार वाढले आहेत. कोरोना व डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे लक्षणे आढळल्यावर तत्काळ चाचणी करू घ्या. त्यानंतरच उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
............
थंड पाणी पिणे व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यूपासून बचावासाठी पाणी उकळून प्या. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी द्या. लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- सतीश डोके, मंगळवेढा.