काळजी घ्या; काेराेना हाेऊन गेलेल्या नागरिकांना आतषबाजीचा होऊ शकतो त्रास
By Appasaheb.patil | Published: October 23, 2022 05:04 PM2022-10-23T17:04:03+5:302022-10-23T17:04:06+5:30
प्रशासनाचे आवाहन : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
साेलापूर : दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांच्या धुरामुळे काेराेना आजार झालेल्या आणि हाेऊन गेलेल्या नागरिकांनाही त्रास हाेण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फाेडण्याऐवजी दिव्यांची आरास करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घाेलप यांनी केले.
केंद्र सरकारने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटक्यांच्या विक्रीला बंदी घातली आहे. १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके फाेडल्यास गुन्हा दाखल हाेईल, असा इशाराही सरकारने दिला आहे. साेलापुरातील अनेक फटाका स्टाॅल्समध्ये माेठा आवाज करणाऱ्या फटाक्यांची विक्री सुरू आहे. यावर महापालिका आणि पाेलिसांचे काेणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. महापालिका प्रशासनाने केवळ आवाहन करून साेपस्कार पूर्ण केले आहेत.
--
या घातक फटाक्यांवर बंदी
केंद्र सरकारने ५ ऑक्टाेबर १९९९ राेजी यासंदर्भात परिपत्रक काढले हाेते. यात माेठा आवाज करणारे बार, लक्ष्मी ताेटा, बाॅम्ब आदी फटाक्यांवर बंदी घातलेली आहे. या फटाक्यांची विक्री झाल्यास काेणती शिक्षा करायची याचीही तरतूद आहे.
-
आजवर एकावरही कारवाई नाही
माेठा आवाज करणाऱ्या फटाक्यांची विक्री राेखण्याबाबत केंद्र सरकारने महापालिका, नगरपालिका, पाेलीस प्रशासनाला कारवाईचे अधिकार दिलेले आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षांत एकाही विक्रेत्यावर कारवाई केली नसल्याचे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
--
दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जाताे. या उत्सवादरम्यान दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी हाेते. यातून वायू व ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणिमात्रांच्या आराेग्यावर परिणाम हाेताे. काेराेना आजार झालेल्या किंवा हाेऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास हाेण्याची भीती आहे. त्यामुळे तरुणांनी फटाके फाेडणे टाळावे. माेठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे अनेकांना श्रवणाचा त्रास हाेऊ शकताे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे.
- मच्छिंद्र घाेलप, उपायुक्त, मनपा