कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:43 PM2020-08-21T12:43:13+5:302020-08-21T12:54:55+5:30

गणपतीच्या आरतीपूर्वी हात स्वच्छ करा; ज्वालाग्राही सॅनिटायझर ऐवजी साबण वापरा

Take care of this before performing Ganpati Aarti in Corona period ... | कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी...

कोरोनाकाळात गणपतीची आरती करण्यापूर्वी या गोष्टीची घ्या खबरदारी...

googlenewsNext
ठळक मुद्देआरती करण्याआधी सॅनिटायझरचा वापर टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले खिशामध्ये, परिसरात, मंडपात सॅनिटायझरची बाटली शक्यतो ठेवू नयेअल्कोहोल त्वचेवर असताना आग जवळ असल्यास तो पेट घेऊ शकतो

सोलापूर :  गणेशोत्सवात अनेक घरात दोन वेळा आरती केली जाते. आरती करत असताना प्रज्ज्वलित केलेले निरांजन अन् कापूर जवळ असतो. सध्याच्या कोरोनाच्या जमान्यात आरती करण्यापूर्वी हात स्वच्छ करायलाच हवा; पण  हाताला ज्वालाग्राही सॅनिटायझर लावला असल्यास तो पेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे आरती करण्याआधी सॅनिटायझरचा वापर टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे़ त्याऐवजी साबणाचा वापर करण्याचेही आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. कामानिमित्त घरातून बहेर पडणारे लोक तर नेहमीच स्वत:जवळ सॅनिटायझर बाळगतात. 

आपल्या हाताला संसर्ग झाल्याची शंका आली की लगेच सॅनिटायझर लावून हात स्वच्छ करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्याशेजारी असलेले लोकही हात पुढे करून सॅनिटायझरचा वापर करतात.

गणपतीची आरती करताना दिवा प्रज्वलित केला जातो. आरती ओवाळताना हात आणि दिवा यामध्ये तसे जास्तीचे अंतर नसते. 
हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर घेताना चुकीने जास्तीचे सॅनिटायझर पडू शकते. तसेच हाताला असलेले सॅनिटायझर पूर्णपणे सुकत नाही. या परिस्थितीत दिवा जवळ असल्यास हात भाजण्याची शक्यता जास्त असते. कापराची आरती करताना देखील हात भाजण्याची शक्यता असते. शिवाय आरती झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेले भाविक दिव्यावर हात धरून आरती घेतात. या स्थितीत सॅनिटायझर जर हाताला लावले तर आगीचा भडका उडू शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

सॅनिटायझर पेट का घेतो? 
साधारणपणे सॅनिटायझरमध्ये ७० ते ७५ टक्के इथाईल अल्कोहोल, १० ते १५ टक्के ग्लिसरीन, एक ते पाच टक्के प्रोपिलीन ग्लायकोल, एक ते पाच टक्के ट्राई इथलोमाईन, पाच टक्के पाणी व सुवासिक रंग असतो. इथाईल अल्कोहोल हे ज्वलनशील असून सॅनिटायझरमध्ये तो अधिक प्रमाणात असतो. तसेच हर्बल सॅनिटायझरमध्येही अल्कोहोलचा वापर केलेला असतो. अल्कोहोल त्वचेवर असताना आग जवळ असल्यास तो पेट घेऊ शकतो. तसेच खिशामध्ये, परिसरात, मंडपात सॅनिटायझरची बाटली शक्यतो ठेवू नये, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.

Web Title: Take care of this before performing Ganpati Aarti in Corona period ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.