अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:26+5:302021-04-03T04:19:26+5:30

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला भेट दिली. यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नियोजनार्थ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची ...

Take immediate action on illegal trades | अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करा

अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करा

Next

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला भेट दिली. यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नियोजनार्थ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूकीविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी तेजस्वी सातपुते यांनी सायंकाळी उशिरा सांगोला पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन दप्तर तपासणी केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील , पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, सांगोल्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. तरीही पोलीस आपल्या परीने चांगले काम करीत आहेत असे सांगून सांगोला शहर व तालुक्यात सुसाट वेगाने दुचाकी चालवणाऱ्या विशेषता: दुचाकीच्या सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वार कारवाई तर कराच. परंतु ज्यांनी सायलेन्सर बदलून दिले त्यांनाही नोटीस बजावा. धाबे, हॉटेल्स आदी ठिकाणी बनावट दारूसह बेकायदेशीर दारू विक्री होत असेल तर बीट अंमलदारांनी छापे टाकून कारवाई करावी. त्यांच्याकडून कारवाई होत नसेल तर त्यांची तत्काळ बीटमधून बदली करा. मटका, गुटखा, जुगार, सावकारकी अशा अवैध धंद्यावर कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालू नका अशा सशक्त सूचना केल्या आहेत. सांगोला शहर व तालुक्यात कोठेही अवैध धंदे चालू असतील तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली आहे.

Web Title: Take immediate action on illegal trades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.