कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:20+5:302021-09-19T04:23:20+5:30

महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी तालुका विधिसेवा समितीच्या वतीने कासारवाडी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ...

Take legal action to prevent domestic violence | कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याचा आधार घ्या

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याचा आधार घ्या

Next

महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी तालुका विधिसेवा समितीच्या वतीने कासारवाडी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक तरतुदींची माहिती होण्यासाठी व शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विधिसेवा प्राधिकरण काम करते. या कामाचा भाग म्हणून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रामीण भागाल कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विधिसेवा समितीचे अध्यक्ष जयेंद्र नं. जगदाळे, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. के. डी. गुंड उपस्थित होते. त्यामध्ये बार्शी, जामगाव, कासारवाडी, सुभाषनगर, लाडोळे या ठिकाणच्या प्रेक्षकांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये महिलांविषयी असलेल्या कायद्यांबाबत ॲड.आर.डी. तारके यांनी मार्गदर्शन केले, तर ॲड. प्रविणा धनाजी सावंत पाटील यांनी न्यायालयीन कामकाजात मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन ॲड. रत्नमाला पाटील यांनी, तर प्रास्ताविक ॲड. कुलकर्णी यांनी केले. आभार ॲड. विकास जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ए.एम. पाणगावकर, व्ही. नाईकवाडी व व्ही. डी. घाडगे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Take legal action to prevent domestic violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.