पॉझिटिव्ह येईपर्यंत माझा स्वॅब चाचणीला घ्या; झेडपीतील डॉक्टराचा विचित्र आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:24 AM2020-06-20T11:24:41+5:302020-06-20T11:26:17+5:30
महसूलच्या व्हॉटसअप ग्रुपमधून झाला पडले बाहेर; सोलापुरातील प्रयोग शाळेतील कर्मचारीही चक्रावले
सोलापूर : कोरोनाच्या साथीमध्ये लक्षणे आढळल्यास आपला अहवाल पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून टेन्शनमध्ये अनेकजण असतात, पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका विचित्र घटनेमुळे अधिकारी चक्रावले आहेत. एका डॉक्टरांनी माझा अहवाल पॉझिटिव्ह येईपर्यंत चाचणीसाठी घ्या असा आग्रह केल्यामुळे प्रयोग शाळेचे कर्मचारी चक्रावले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये महापालिकेचा एक आरोग्य अधिकारी येऊन गेला त्यानंतर तो अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले त्याच्या संपकार्मुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकाºयांसह अकरा कर्मचाºयांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले, त्यात शिपाई पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्याच्या संपर्कातील ३१ जणांचे तपासणीसाठी घेण्यात आले, त्यामध्ये कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही पण एका डॉक्टरांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट येईपर्यत स्वॅब घेण्यासाठी आग्रह केल्यामुळे प्रयोगशाळेचे कर्मचारी चक्रावले आहेत.
विशेष म्हणजे त्या डॉक्टराचा स्वॅब दोन वेळा घेण्यात आला आहे. दोन्ही वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आहे पण आता तिसºया वेळेस ही तपासणीसाठी स्वॅब घ्या असा त्या डॉक्टरने आग्रह केला आहे़ विशेष म्हणजे या डॉक्टरांवर जिल्ह्यातील साथरोगाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याची जबाबदारी आहे, यासाठी जिल्हाधिकाºयांनी महसूल विभागाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे, या ग्रुप मधून हा डॉक्टर लेफ्ट झाले आहेत़. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वारंवार निरोप पाठविण्यात आल्यानंतर ही त्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला नाही, ही बाब गंभीर असून आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़