घेतले आठ हजार, पावती दिली ५०० रुपयांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:48+5:302021-04-26T04:19:48+5:30
१० दिवसांपूर्वी अक्कलकोट येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे अंत्यविधीसाठी येता आले नाही, म्हणून कर्नाटकातील माशाळ येथील पाहुण्यांनी ...
१० दिवसांपूर्वी अक्कलकोट येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे अंत्यविधीसाठी येता आले नाही, म्हणून कर्नाटकातील माशाळ येथील पाहुण्यांनी २४ एप्रिल रोजी रोजी सकाळी अक्कलकोट येथे येऊन भेट घेऊन सांत्वन केले. ते परत कर्नाटकातील मशाळला जात होते. तेव्हा शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील कालिका मंदिराजवळ पोलीस पथक कारवाईसाठी थांबले होते. तेव्हा तेथून जाताना वाहतूक पोलिसांनी आमची कार अडवली. कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा राज्य शासनाने आंतर राज्य, परराज्य या अध्यादेशाची भीती दाखवून १० हजारांची मागणी केली. तेव्हा ८ हजार रुपयांवर तोडगा निघाला. मात्र, त्यांना केवळ ५०० रुपयांचे पावती दिली. याबाबत त्या पाहुण्यांनी विचारले असता, तुम्हाला व तुमची गाडी ही आत ठेवावी लागेल, अशी भीती घातली. त्या भीतीने पाहुण्यांनी ८ हजार रुपयांचा दंड दिला व ते निघून गेले. घडला प्रकार कर्नाटकातील पाहुण्यांनी अक्कलकोटच्या पाहुण्यांना सांगून पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
अक्कलकोट येथे त्या समाजाचे शेकडो पाहुणे असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यावरून अक्कलकोट पोलिसांबद्दल उलटसुलट चर्चा रंगली.
पावतीवर खाडाखोड
कर्नाटकातील अफझलपूर तालुक्यातील माशाळ येथील कार क्रमांक केए-३२, ७९२५ या गाडीचालकाला अडवून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ५०० रुपयांची पावती देऊन ८ हजार रुपये पोलिसांनी घेतले आहेत. त्यावर नावात, तारखेमध्ये खाडाखोड केलेली दिसत आहे. यावरून ही पावती कोणत्या तरी वाहनधारकासाठी केलेली असावा, तीच पावती त्यांना दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकंदरीत पावती एक, रक्कम दोन वाहनधारकांकाडून घेतलेली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईस विरोध नसून, घेतलेली रक्कम व दिलेली पावती, याबद्दल शंका असल्याचे पाहुण्यांनी सांगितले.
कोट :::::::::
अक्कलकोट येथील पाहुण्यांचा मृत्यू १० दिवसांपूर्वी झाला होता. मी माझ्या कुटुंबीयांसह भेटण्यासाठी गेलो होतो. परत येताना शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर पांढरा ड्रेस परिधान केलेल्या शेख नावाच्या वाहतूक पोलिसाने अडवून दहा हजार रुपये मागितले. होय, नाही म्हणत ८ हजार रुपये घेतले आणि ५०० रुपयांची पावती दिली.
-सिद्धाराम अनिलप्पा वामोरे
पावती व अधिकारी यांचे कोट
कोट :::::::
असे घडल्याचे संबंधितांनी वेळीच सांगितले असते, तर चौकशी करून कारवाई केली असती. अशा चुकीच्या पद्धतीने घडले असेल, तर ते योग्य नाही. तरीही घडलेली घटना व दिलेल्या पावतीवरून चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास वरिष्ठांना माहिती देऊन कारवाई करू.
- महेश भाविकट्टी,
सहा. पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस ठाणे