५० हजाराची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपंचायत कार्यालयातील रोखपाल अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:02 PM2017-09-08T14:02:59+5:302017-09-08T14:03:38+5:30
प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ रामचंद्र जगन्नाथ पवार (वय ४५) असे लाच स्वीकारणाºया रोखपालाचे नाव आहे़ ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली़
तक्रारदार हे ठेकेदार आहेत़ त्यांनी मंगळवेढा नगरपरिषद हद्दीत त्यांनी विविध कामे केलेली आहेत़ त्यापैकी दोन कामांचे बिल (१२ लाख ५४ हजार ३०५) एवढे बिल बांधकाम विभागाने मंजूर करून प्रमाणक लेखा शाखेत दिली होती़ सदर प्रमाणकावरून तक्रारदारास चेक तयार करून देण्यासाठी रोखपाल पवार यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाचेची रक्कम स्वीकारताना रोखपाल पवार यास मंगळवेढा नगरपंचायत कार्यालयात रंगेहाथ पकडले़ ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली़ यात उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस निरीक्षक मारकड व अन्य पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़