शंकरमधून उत्पादित साखर घेऊन ३० किमीचे अंतर पार करीत चेअरमन पोहोचले शिखरशिंगणापूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:16+5:302021-02-06T04:39:16+5:30
कारखान्याचे २७ जानेवारी रोजी मोळी पूजन झाले व १ फेब्रुवारीपासुन ऊस गाळप सुरू झाले. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ...
कारखान्याचे २७ जानेवारी रोजी मोळी पूजन झाले व १ फेब्रुवारीपासुन ऊस गाळप सुरू झाले. ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता साखर उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्या पाच साखर पोत्यांचे पहाटे ५.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर साखरेचे पहिले पोते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखरशिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी सदाशिवनगर येथील कारखाना स्थळावरून चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे रवाना झाले. त्यांच्यासोबत सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, संचालक सुधाकर पोळ-पाटील, सुनील माने, सुरेश मोहिते, बाबाराजे देशमुख, रमेश जगताप, ज्ञानदेव पवार, मामासाहेब पांढरे, राहुल वाघमोडे, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, राजेंद्र काकडे, संतोष साठे, बाळासाहेब वायकर, सोमनाथ भोसले, संजय राखलेसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
... म्हणून पहिले साखर पोते शंभू महादेवाला अर्पण
शंभू महादेवाच्या पायथ्याला त्या देवाच्या नावानेच कारखाना उभारला. मात्र, काही कारणामुळे बंद पडला. पुन्हा नव्या जोमाने तो सुरू झाला आहे. त्यामुळे सभासदांचे श्रद्धास्थान असलेल्या कारखान्यातून उत्पादित साखरेचे पहिले पोते महादेवाला अर्पण करावे, अशी सर्वांची श्रद्धा होती म्हणूनच साखरेचे पहिले पाेते चालत जाऊन देवाला अर्पण केले, असे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
फोटो
०४माळशिरस०१
ओळी
सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्यातून उत्पादित साखर घेऊन शिखरशिंगणापूरला जाताना चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील,
सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, संचालक व कार्यकर्ते.