तक्तालिन आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांचे निलंबन रद्द; मॅटचा निर्णय
By शीतलकुमार कांबळे | Published: May 13, 2023 03:09 PM2023-05-13T15:09:47+5:302023-05-13T15:10:43+5:30
सहायक संचालक (कुष्ठरोग) पदावर नियुक्ती
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांचे निलंबन मॅटने (महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण) रद्द केले आहे. त्यांची सहायक संचालक (कुष्ठरोग) पदावर पदस्थापना नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण प्राप्त न झाल्याने त्यामुळे डॉ. जाधव यांच्यावर कारवाई झाली होती. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागपूर येथील अधिवेशनात डॉ. शितलकुमार जाधव यांचे निलंबन केल्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करत असल्याची घोषणा करण्यात आली होती. शासन स्तरावरील प्रशासनाकडून वारंवार पत्र देऊन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले होते.
डॉ. जाधव यांचे निलंबन काळातील मुख्यालय हे गडचिरोली होते. त्यांनी मॅटमध्ये मुख्यालय बदलण्यासाठी दाद मागितली होती. मॅटने त्यांचे म्हणणे ऐकत त्यांचे मुख्यालय हे सोलापूर असावे असे सांगितले होते. त्यानंतर आता मॅटने डॉ.जाधव यांचे निलंबन रद्द केले आहे. तसेच त्यांची धुळे येथील सहायक संचालक (कुष्ठरोग) पदावर नियुक्ती करण्यात आली.