वाळूमाफियांच्या अटकेसाठी तलाठी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:57+5:302021-03-13T04:40:57+5:30
यावेळी तलाठी संघटनेतर्फे तहसीलदार अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. कोरडा नदीपात्रातून अवैधपणे वाळूचोरी करून पळून जाणाऱ्या वाहनास पकडून ...
यावेळी तलाठी संघटनेतर्फे तहसीलदार अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. कोरडा नदीपात्रातून अवैधपणे वाळूचोरी करून पळून जाणाऱ्या वाहनास पकडून तहसील कार्यालयाकडे कारवाई करण्यासाठी घेऊन येताना स्कार्पिओमधून आलेल्या चौघांनी महसूल पथकातील तलाठी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्कार्पिओ अंगावर घातली, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला गेल्याने तीच स्कार्पिओ उजव्या बाजूच्या खुब्याला घासून खाली पडल्याने दुखापत झाली. ही घटना २ मार्च रोजी सोनंद येथील कोरड्या नदीपात्रात घडली.
याबाबत तलाठी प्रकाश पांडुरंग गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ऋषी बाबर, योगेश बाबर, महिपती बोराडेसह अनोळखी व्यक्ती अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. त्यामुळे तलाठी संघटनेने बैठक घेऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
निवेदनावर तलाठी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, दिनेश सोनुने, गजानन चाफेकर, हौसराव दराडे, अण्णासाहेब नटवे, हरीश काटकर, जी. बी. तनमोर, ए.डी. धनावडे, एन.व्ही. खरात, के. एन. बाडीवाले, एम.एन. घाडगे, जी.बी. भुजबळ, सी.पी. पिसे, बी.एम. शिंदे, वाय.बी. पंगूडवाले, ए. डी. लोखंडे, डी.जी. आरगडे, एस.के. खंडागळे, दिनेश भडंगे, बी.एन. कदम, एस.के. जाधव, पी.यु. काशीद, के.ए. राजवाडे, एस.डी. रामोड, डी. एस. शिंदे, एम.आर. गायकवाड, एन. एस. अन्सारी यांच्या सह्या आहेत.