पुढे दुचाकीवर तलाठी... मागे वाळूने भरलेला टिपर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:23 AM2021-04-27T04:23:25+5:302021-04-27T04:23:25+5:30

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरून जुना कराड नाका या रस्त्याने दोन टिपरमध्ये वाळूची वाहतूक होणार असल्याची माहिती सपोनि. राजेंद्र ...

Talathi on a two-wheeler in front ... a tipper filled with sand in the back ... | पुढे दुचाकीवर तलाठी... मागे वाळूने भरलेला टिपर...

पुढे दुचाकीवर तलाठी... मागे वाळूने भरलेला टिपर...

Next

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरून जुना कराड नाका या रस्त्याने दोन टिपरमध्ये वाळूची वाहतूक होणार असल्याची माहिती सपोनि. राजेंद्र गाडेकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ. सूरज हेंबाडे, शोएब पठाण, सुनील बनसोडे, राजेश गोसावी यांच्यासह पंचायती समिती परिसरात थांबले. त्यानंतर काही वेळाने तेथून एमएच- ४५ एझेड- ३००२ या क्रमांकाची मोटारसायकल व एमएच १२ एसएफ ५८१० व एमएच ०५ एएम २०६० या क्रमांकाचे टिप्पर जाताना दिसले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्याला जुना कराड नाका येथील एका वरद विनायक रुग्णालयासमोर आडवले. यावेळी चालक रवींद्र अर्जुन पाटोळे (रा.जुनी पेठ, पंढरपूर), गणेश महादेव बगल (रा.गादेगाव, ता. पंढरपूर) यांच्याकडे वाळू वाहतूक व वाळू उपसा करण्यासाठी शासनाची परवानगी असलेल्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी तलाठी अमर धर्मराज पाटी (रा. लाडनगर, पंढरपूर) यांच्या बांधकामासाठी वाळू घेऊन जात असल्याचे समोर आले. यामुळे तसेच वाळू ही ओझेवाडी येथील संतोष गायवाड यांच्या घरासमोर सावकर गायकवाड (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) यांच्या जेसीबीने भरली असल्याचे सांगितले. या कारवाईदरम्यान २ टिप्पर व ८ ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर रवींद्र अर्जुन पाटोळे (रा.जुनी पेठ, पंढरपूर), गणेश महादेव बगल (रा.गादेगाव, ता. पंढरपूर), विशाल भारत आवताडे, अमर धर्मराज पाटील (रा.लाडनगर, पंढरपूर), बापू आत्माराम कुंभार (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर), सावकर गायकवाड (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- पाच जणांना एक दिवस पोलीस कोठडी :::

रवींद्र अर्जुन पाटोळे (रा.जुनी पेठ, पंढरपूर), गणेश महादेव बगल (रा.गादेगाव, ता. पंढरपूर), विशाल भारत आवताडे, अमर धर्मराज पाटील ( रा.लाडनगर, पंढरपूर ), बापू आत्माराम कुंभार (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) या पाच जणांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्या पाच जणांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर जेसीबीमालक सावकर गायकवाड यांना रात्री उशिरा अटक केली असल्याची माहिती सपोनि. राजेंद्र गाडेकर यांनी दिली.

Web Title: Talathi on a two-wheeler in front ... a tipper filled with sand in the back ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.