तालुक्याला ११ हजार ६०० टन खताची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:51+5:302021-06-01T04:16:51+5:30
यावर्षी जमिनीतील पाणीपातळी चांगली असून सध्या पावसाची हजेरी लागल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम लाभदायी ठरेल, अशी आशा आहे. गतवर्षीच्या दृष्टीने ...
यावर्षी जमिनीतील पाणीपातळी चांगली असून सध्या पावसाची हजेरी लागल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम लाभदायी ठरेल, अशी आशा आहे. गतवर्षीच्या दृष्टीने यावर्षी खतटंचाईचा प्रश्न पुढे येऊ नये, या दृष्टीने माळशिरस पंचायत समितीने बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी सभापती शोभा साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, तालुका कृषी अधिकारी जी. जी. ननवरे, कृषी अधिकारी एन. एच. चव्हाण, राहुल वाघमोडे, संदीप घाडगे आदी उपस्थित होते.
पाच विभागांत होणार खताचे वाटप
माळशिरस, सदाशिवनगर, इस्लामपूर (२८१३ टन), नातेपुते, दहिगाव (१७०७ टन), पिलिव, वेळापूर (२२०१ टन), अकलूज, लवंग (१७१० टन), महाळुंग (१०७० टन) असा ११ हजार ६०० मे. टन युरिया खताचे पाच विभागांत उद्दिष्ट ठेवण्यात आले. यामध्ये २१०० मे. टन युरिया खत प्राप्त झाले असून ९५०१ टन युरिया खताची मागणी केली आहे.
कोट :::::::::::::::
यावर्षी खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाणे, खते व इतर व्यवस्थापनाबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत टप्प्या-टप्प्याने मागणीप्रमाणे युरिया खत उपलब्ध होईल. याबाबत काही तक्रारी वाटल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- गजानन ननावरे,
तालुका कृषी अधिकारी, माळशिरस