मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या दौऱ्याकडे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:00 AM2020-10-22T10:00:41+5:302020-10-22T10:01:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोलापूर आणि उस्मानाबाद दौऱ्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख आणि उस्मानाबादचे माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी केली. सोमवारी सकाळी त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मानाबादकडे रवाना झाले.
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा सेनेचा कारभार आमदार तानाजी सावंत यांच्याकडेच होता. मंत्रीपद डावलल्यापासून सावंत सेनेपासून दूर आहेत. मागील दोन दिवस त्यांनी परंडा भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. ठाकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहिल्यामुळे चर्चेला उधाण झाले.
---
माझी आई आजारी आहे. उध्दव ठाकरे यांची परवानगी घेऊनच मी गैरहजर राहिलो. काल मी परंड्याच्या दौऱ्यावर होतो. पण हा दौराही मी अर्धवट सोडला होता.
- तानाजी सावंत, आमदार, परंडा.