रसायन घेऊन जाणारा टँकर पकडला<bha>;</bha> चालक पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:10+5:302021-02-17T04:28:10+5:30
याबाबत पोलीस सूत्रांनुसार मोहोळ पोलीस ठाण्यातील मंगेश बोधले, रवी बाबर, अमोल घोळवे यांचे पथक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या ...
याबाबत पोलीस सूत्रांनुसार मोहोळ पोलीस ठाण्यातील मंगेश बोधले, रवी बाबर, अमोल घोळवे यांचे पथक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. शेटफळ ते मोहोळ रोडवर हिवरेफाट्यासमोरून येणाऱ्या दहा चाकी टँकर (क्र. एम एच ११ एम ३७५७) चा त्यांना संशय आल्याने त्यांनी हे वाहन रस्त्याच्या कडेला थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला थांबवत त्यातून उडी घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्याच्यासोबत असलेला साथीदार रवी पवार (रा. मुस्ती तांडा, पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याला ताब्यात घेतले. याबाबत अधिक चौकशी केली असता आंबट मळीसारखा वास येणारे रसायन असल्याचे दिसून आले.
या रसायनाच्या परवान्याबाबत, तसेच परमिटबाबत चौकशी केली असता काहीही आढळून आले नाही.
या टँकरमध्ये एकूण १५ टन मळी व टँकर, असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी रवी पवार याला व चालक जावेद (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) त्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ फ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या रवी पवार यास न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मंगेश बोधले यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास फौजदार देवडे करीत आहेत.