करवसुली करा; अन्यथा घरी जा, सोमपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची तंबी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:01 PM2017-12-13T16:01:58+5:302017-12-13T16:03:20+5:30

महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत.

Taxes tax; Otherwise, go to the house, sacking of Sompa Commissioner Avinash Dhakane | करवसुली करा; अन्यथा घरी जा, सोमपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची तंबी 

करवसुली करा; अन्यथा घरी जा, सोमपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची तंबी 

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व कर्मचाºयांना मिळकतकर वसुलीच्या मोहिमेसाठी नेमलेजीएसटीचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाºयांचा पगार होत नाही कर वसूल करा; अन्यथा हे काम जमत नसेल तर खुशाल राजीनामा देऊन घरी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३  :  महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत. ही कोटींची उड्डाणे पाहिली तरी जीएसटीचे अनुदान आल्याशिवाय कर्मचाºयांचा पगार होत नाही. त्यामुळे सर्व कर्मचाºयांना मिळकतकर वसुलीच्या मोहिमेसाठी नेमले आहे. कर वसूल करा; अन्यथा हे काम जमत नसेल तर खुशाल राजीनामा देऊन घरी जा, अशा शब्दात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी कर्मचाºयांना तंबी दिली. 
मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपातर्फे १५ ते ३0 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये २०८ कर्मचारी राहणार आहेत. हे कर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये विखुरले जाणार असून, थकबाकी असलेल्या प्रत्येक मिळकतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 
या मोहिमेत थकबाकी न भरणाºयांचे नळकनेक्शन तोडणे व मिळकती सील, जप्ती करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पथकात समाविष्ट केलेल्या कर्मचाºयांची सायंकाळी सभागृहात बैठक घेण्यात आली. 
बैठकीत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी कर्मचाºयांना वसुलीबाबत मार्गदर्शन केले. नोटिसा देणे, जप्तीची कारवाई कशी करावी याबाबत मार्मिक सूचना दिल्या. त्याचबरोबर कर्मचाºयांना मनपाच्या ऐपतीबाबत जाणीव करून दिली. नेमून दिलेल्या कामात कुचराई करू नका. काम करायचे नसेल तर स्वेच्छानिवृत्ती घ्या, सर्व लाभ मिळतील. ऐतखाऊ कर्मचाºयांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. निलंबन करणे मलाही आवडत नाही. पण परिस्थितीच अशी आहे की इथे काम केल्याशिवाय आता दाम मिळणार नाही. कर्मचाºयांनी किती उद्दिष्ट पूर्ण केले याचा जानेवारीत आढावा घेतला जाईल. ज्यांचे काम समाधानकारक नाही त्यांच्या पर्यवेक्षकालाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
 याप्रसंगी उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, कर संकलन विभागप्रमुख आर. पी. गायकवाड, जोशी आदी उपस्थित होते. 
-------------------------
दवाखाना पाहताना लाज वाटली
च्आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मनपाचा कारभार सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना सोमवारी सायंकाळी बाईज हॉस्पिटलला दिलेल्या भेटीचा अनुभव सांगितला. हॉस्पिटलची व्यवस्था पाहून मला लाज वाटली. इमारतीवर झाड आले आहे आणि कर्मचारी २0 वर्षांपासून पत्रव्यवहार करीत बसले आहेत. कोणतीही समस्या छोटी असतानाच आपल्या पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा. वसुली मोहिमेत मिळकतदाराच्या घरी गेल्यावर ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, मृत्यू झालेल्यांच्या ठिकाणांची दखल घ्या. तशी नोंद घ्या व वरिष्ठांना कळवा. आदेश आहे म्हणून आपल्याकडे भावना नाहीत असे वागू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

Web Title: Taxes tax; Otherwise, go to the house, sacking of Sompa Commissioner Avinash Dhakane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.