शाळेतून कमी केल्याप्रकरणी शिक्षिकेची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:11+5:302021-04-08T04:22:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : कामावरुन विनाकारण काढून टाकल्या प्रकरणी पदाअधिकारी व मुख्याध्यापक यांच्या विरोधात अक्कलकोट येथील न्यायालयात एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : कामावरुन विनाकारण काढून टाकल्या प्रकरणी पदाअधिकारी व मुख्याध्यापक यांच्या विरोधात अक्कलकोट येथील न्यायालयात एका महिला शिक्षिकेने फिर्याद दाखल केली आहे. संबंधितांना तत्काळ हजर राहणाची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
येथील अंजुमन ए तरकीबे तालीम संस्थेचे अँग्लो उर्दू हायस्कूल येथे २०१० पासून फिर्यादी समिना तहसीन हिरापुरी या शिक्षिका कार्यरत होत्या. त्यांना संस्थेने कोणत्याही पूर्वसूचना न देता २०१८ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर त्या शिक्षिकेने त्यांच्या विरोधात शाळा न्यायाधिकरणं सोलापूर येथे अपील दाखल केले होते. कामावर पुन्हा घेण्याचे आदेश होते. तरीही संस्थाचालकांनी रुजू करून घेतले नाही. त्यानंतर हिरापुरी यांनी त्या विरोधात अक्कलकोट येथील न्यायालयात वकील मार्फत फिर्याद दाखल केली होती.
न्यायाधीशांनी युक्तिवाद ऐकून संस्थेचे अध्यक्ष अ.गनी अ.कादर हिप्परगी, तत्कालीन मुख्याध्यापक मौलाली शरीफ बागवान, महंमद सौफुद्दीन काझी व इतर पदाधिकारी यांच्या विरोधात फिर्याद दाखल करून घेतली. त्यानंतर सर्वांना ९ एप्रिल रोजी न्यायाधीश जी. बी. नंदगवळे यांच्या समोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. तक्रारदार मार्फत वकील विजय हर्डीकर यांनी काम पाहात आहेत.
----