झेडपीचे सीईओ वायचळ यांच्यावि़रूद्ध शिक्षकांची ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 12:13 PM2020-11-03T12:13:54+5:302020-11-03T12:14:43+5:30

प्रश्न सोडवित नसल्याबद्दल कोल्हापुरात दिले निवेदन

Teachers lodge complaint against ZP CEO Vaichal with Rural Development Minister | झेडपीचे सीईओ वायचळ यांच्यावि़रूद्ध शिक्षकांची ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रार

झेडपीचे सीईओ वायचळ यांच्यावि़रूद्ध शिक्षकांची ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रार

Next

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ हे प्रश्न सोडवित नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात भेट घेऊन केली आहे. 


दरम्यान,  विविध पदांच्या पदोन्नतिसह आंतरजिल्हा शिक्षकांचे  समुपदेशन करतानाच यादीमध्ये विस्थापित व रॅण्डम राऊंड मधील शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्य संघाचे मोहन भोसले,कार्याध्यक्ष एन. वाय. पाटील यांच्याबरोबर  सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, मनोज गादेकर यांनी मंगळवारी सकाळी कोल्हापुरात  ग्रामविकास मंत्र्यांची घेतली.

काशीद यांनी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने लक्ष घालण्याची विनंती केली.  इतर जिल्ह्यातून बदलीने येणारे शिक्षक हजर झाल्यानंतर समुपदेशन घेण्यास विलंब, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी पदाची पदोन्नती रखडली आहे.  पुणे विभागीय आयुक्तांनी दोषमुक्त केलेल्या शिक्षकांचे  समुपदेशन करावे,गेल्या दोन वर्षात विविध प्रश्नावर झालेल्या चचेर्ची परंतु न झालेल्या कामांची ही आठवण या निवेदनात करून देण्यात आली आहे. 


कारीतील शिक्षकांचा प्रश्न

बार्शी तालुक्यातील कारी हे गाव उस्मानाबादला जोडण्यात आले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील शिक्षकांनी उस्मानाबाद विकल्प निवडला आहे. पण शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी असे समायोजन करता येत नाही असे म्हटले आहे. 


प्रश्नच सुटले नाहीत

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदांची पदोन्नती केल्यानंतर शाळा नियुक्तीचे समुपदेशन घेतले तर रिक्त जागांचे पर्याय वाढतील. पण दोन वर्षे पाठपुरावा करून प्रशासनाने यावर निर्णय घेतलेला नाही.
- बब्रुवाहन काशिद
सरचिटणिस, जिल्हा शिक्षक संघ.

Web Title: Teachers lodge complaint against ZP CEO Vaichal with Rural Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.