राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी दक्ष राहावे - डॉ. प्रकाश महानवर

By संताजी शिंदे | Published: May 28, 2024 06:34 PM2024-05-28T18:34:43+5:302024-05-28T18:35:18+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर बोलत होते.

Teachers should be vigilant for implementation of National Education Policy - Dr Prakash Mahanwar | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी दक्ष राहावे - डॉ. प्रकाश महानवर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी दक्ष राहावे - डॉ. प्रकाश महानवर

सोलापूर : यंदाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. ३४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व संस्थांचालक, प्राचार्य व शिक्षकांनी दक्ष राहून योगदान द्यावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
      
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर बोलत होते. यावेळी मंचावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव योगिनी घारे, वक्ते मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंदार भानुशे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी यांनी करून दिला.
      
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना एका बहु विद्याशाखीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामध्ये विविध विषय घेऊन विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करता येईल. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संलग्नित महाविद्यालयांनी देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नियोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

Web Title: Teachers should be vigilant for implementation of National Education Policy - Dr Prakash Mahanwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.