सोलापूर जिल्हा परिषदेमधील शिक्षकांनो सावधान; ब्लेझर न घातल्यास सर्व्हिस बुकवर लाल शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 07:49 PM2018-11-15T19:49:18+5:302018-11-15T19:51:00+5:30
विरोध करणाºयांची डीई: तपासणीसाठी २८00 कर्मचाºयांची नियुक्ती
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी १९ नोव्हेंबर रोजी शाळेवर आल्यावर परिपाठाच्यावेळी ब्लेझर न घातल्यास सर्व्हिस बुकवर लाल शेरा मारला जाणार आहे तर संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करणाºया शिक्षकांची डीई सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी झेडपी शाळांचा पहिला दिवस आहे. प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे या दिवशी सर्व शिक्षकांनी स्थानिक ड्रेसकोडबरोबर काळा ब्लेझर परिधान करणे बंधनकारक आहे.
ब्लेझरबाबत काहींनी विनाकारण गैरसमज पसरविला आहे. ड्रेसकोडबाबत झेडपीच्या सभेने एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे व पाच सभापतींनी १९ शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर १६ आॅक्टोबर रोजी या निर्णयाबाबत चर्चा केली. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीच ब्लेझरचा विषय पुढे केल्याचे डॉ. भारूड यांनी स्पष्ट केले. ब्लेझरला संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत सर्वानुमते मान्यता दिली. त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. पण नंतर काहींनी ब्लेझरबाबत गैरसमज पसरवून विरोध सुरू केल्या आहे. ब्लेझर शाळेतील परिपाठ, राष्ट्रीय सण व बैठकांच्यावेळीच परिधान करायचा आहे. पूर्ण दिवसभरात गावकºयांना भेटताना शिक्षकांना ब्लेझर घालण्याची गरज नाही.
पहिल्या दिवशी होणार तपासणी
१९ नोव्हेंबर रोजी परिपाठाच्यावेळी सर्व शाळांची तपासणी करण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यासाठी २८00 कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी सर्व गट विकास व गट शिक्षण अधिकाºयांची कार्यशाळा होणार आहे.